नविन वर्षासाठी आर्थिक नियोजनाच्या टिप्स (year 2023)
मागच्या वर्षाचा आढावा घ्या
->यामधे मागील वर्षी आपण जे काही अर्थिक उद्दिष्ट ठरवले होते ते साध्य झाले का नाही ते एका Notes मधे लिहा
-> वर्षभरामधे झालेला income व खर्च लिहून काढा
-> गुंतवलेले पैसे घेतलेले कर्ज , Emi हप्ते एखादा मोठा आर्थिक व्यवहार या सर्वाचे आर्थिक विश्लेषण करा
-> यामधे झालेल्या चुका लक्षात घेवूनच पुढील वर्षाचे नियोजन करायचे आहे
-> तसेच मागील वर्षात तुम्हाला एखादा फटका बसला असेल किंवा मेडिकल Emergency झालेली असेल तर त्याचे विश्लेषण करा .
नवीन वर्षाचा अर्थसंकल्प
-> यामधे अपेक्षित income , खर्च , गुंतवणुक तसेच आर्थिक ध्येय सुनिश्चित करून त्यानुसार plan करायचा आहे उदा.
यावर्षी तुमची वर्षिक बचत 1 लाखाची आहे व त्यातील 60 हजार मला Mutual Fund मधे गुंतवायचे आहे त्याप्रमाणे महिना 5000 रू तुम्ही plan करू शकता
-> भविष्यात येवू घातलेला खर्च त्यादृष्टीने आता पासूनच planning केलेले बरे
-> सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक नियोजन कोणत्याही पद्धतीने करा पण अर्थिक शिस्त खूप महत्वाची आहे, आणि ति बळगली तरच आर्थिक नियोजन व्यवस्थित होइल
गुंतवलेल्या पैशाचे पूर्वावलोकन
-> तुम्ही मागील वर्षी काही पैसे गुंतवले असतीलच mutual funds , bonds , shares असतील या सर्व गोष्टी चे व्यवस्थित विश्लेषण करायचे आहे , तुमच्या अपेक्षे प्रमाणे त्याचा परतावा मिळाला आहे का नाही .
-> अपेक्षेप्रमाणे परतावा नसेल त त्य गोष्टी change करायच्या आहेत
-> मागील वर्षाच्या परताव्या नुसार विश्लेषण करायचे आहे
कर नियोजन
-> तुम्ही या वर्षी किती Tax भरला , त्यानुसार tax वाचविण्या केलेल्या योजना तपासा
-> पुढील वर्षी अंदाजे किती Tax भरावा लागेल, उपाययोजना लिहून ठेवा
विमा संरक्षण
-> लोक विमा संरक्षणा कडे गांभीर्याने पाहत नाहीत , परंतु काळाची गरज समजून याकडे पहा
-> आपत्ती काळा मधे याची उत्तम मदत होते
-> आपल्या कुटुंबांच्या संरक्षणा साठी आरोग्य विमा व जीवन विमा खूप महत्वाचे आहे
तुमच्या ध्येयाचे पूर्वावलोकन (Shot term goals& Long term goals)
-> तुमची छोटी व मोठी अर्थिक ध्येय यांचे विश्लेषण करा , यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात करा
-> अंदाजे किंमत ठरवून आर्थिक नियोजना मधे समाविष्ट करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा